शेगावमध्ये आढळला अनाथ “खड्डा’!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिशय वर्दळीच्या शेगाव- खामगाव रोडवरील महावितरण चौकात मधोमध पेव्हर ब्लॉक उखडून भलामोठा खड्डा पडलेला आहे. तो दुरुस्तीची जबाबदारी नक्की कोणाची आहे, असा प्रश्न शेगावकरांना पडला आहे. कारण बांधकाम विभाग आणि नगरपालिका दोन्हीही रस्ता आमचा अखत्यारित नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या खड्ड्याचा वाली शोधण्याची वेळ आली आहे. तीन …
 
शेगावमध्ये आढळला अनाथ “खड्डा’!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिशय वर्दळीच्‍या शेगाव- खामगाव रोडवरील महावितरण चौकात मधोमध पेव्‍हर ब्लॉक उखडून भलामोठा खड्डा पडलेला आहे. तो दुरुस्तीची जबाबदारी नक्की कोणाची आहे, असा प्रश्न शेगावकरांना पडला आहे. कारण बांधकाम विभाग आणि नगरपालिका दोन्‍हीही रस्‍ता आमचा अखत्यारित नसल्याचे सांगत आहेत. त्‍यामुळे या खड्ड्याचा वाली शोधण्याची वेळ आली आहे.

तीन आठवड्यांपूर्वी पेव्‍हर ब्‍लॉक उखडून हा खड्डा पडला आहे. त्‍यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. शेगाव येथून खामगावकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने शेकडो वाहने या रस्‍त्‍यावरून धावतात. याच चौकातून व्यंकटेशनगर, सरस्वतीनगर, राजश्रीनगर, शेगाव बसथांबा, पटवारी कॉलनीसह विविध नवीन वस्ती तसेच कॉलनी यासोबतच आळसणा, जानोरीकडे जावे लागते. संबंधित अधिकाऱ्यांनी या खड्ड्याकडे लक्ष देऊन तो बुजवावा, अशी मागणी होत आहे.