शेगावमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारा; डॉ. असलम खान यांचे मंत्री यशोमती ठाकूर यांना साकडे
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव मतदारसंघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या शेगाव येथील निवासस्थानी महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली होती. या वेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. असलम खान श्रीमती ठाकूर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शेगाव शहरात अभ्यासिका उभारावी, अशी मागणी डॉ. खान यांनी प्रामुख्याने निवेदनात केली. युवक काँग्रेस अध्यक्ष जुबेर सहारा यांनीही निवेदन दिले. शेगाव येथे सरकारी रुग्णालयात येथे महिलांच्या डिलिवरी व सिजरसाठी 24 तास डॉक्टरांची टीम उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश प्रतिनिधी रामविजय बुरूंगले, माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, जयंतराव खेळकर, शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष शेख अफरोज, अल्पसंख्याक आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष सय्यद जहिर अली, सोशल मीडिया उपाध्यक्ष स्वप्निल देशमुख, संदीप काळे, सौ. सुनिता कलोरे. आसीफ खान, अब्दुल कादर, दानिश मोवाल, सलमान सुलतान, शेख अजहर, अ. रहीम शेख, अश्फाक खान, शोएब ईरानी, जुनेद बेग, अशू जमादार, बुडन ईराणी, जफर मुल्लाजी, असलम ईराणी गोलू, शेख इरफान शेख बुढन आदी उपस्थित होते.