शेगाव भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर; शहराध्यक्ष साखरे यांनी कार्यकर्त्यांना दिले पदाचे बळ!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव भाजपची जंबो कार्यकारिणी आज, 21 जानेवारीला जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांनी कार्यकर्त्यांना पदाचे बळ देत आगामी नगर परिषद निवडणुकीची व्यूहरचनाच या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.शहर कार्यकारिणी अशी ः शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, उपाध्यक्ष संजय कलोरे, गजानन जवंजाळ, जितेंद्र अग्रवाल, शंकर माळी, सौ. ज्योतीताई कचरे, …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव भाजपची जंबो कार्यकारिणी आज, 21 जानेवारीला जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष ज्ञानेश्‍वर साखरे यांनी कार्यकर्त्यांना पदाचे बळ देत आगामी नगर परिषद निवडणुकीची व्यूहरचनाच या माध्यमातून केल्याचे दिसून येत आहे.
शहर कार्यकारिणी अशी ः शहराध्यक्ष ज्ञानेश्‍वर साखरे, उपाध्यक्ष संजय कलोरे, गजानन जवंजाळ, जितेंद्र अग्रवाल, शंकर माळी, सौ. ज्योतीताई कचरे, सचिन ढमाळ, विजय यादव व सुरज खांजोडे, सरचिटणीस दीपक धमाल, पुरुषोत्तम हाडोळे, कमलाकर चव्हाण, डॉ. रवींद्र कराळे, चिटणीस मुकिंदा खेडकर, आशिष देशमुख, मंगेश फुसे, फेमिदा बानो, मोहम्मद सादिक, सुषमा नितीन शेगोकार, नरेंद्र गंगणे, रामदास घुले, किरण विजय देशमुख. कोषाध्यक्ष अशोक चांडक, सोशल मीडिया प्रमुख प्रकाशराव लानी, प्रसिद्धीप्रमुख उमेश राजगुरे. यांसोबतच शहरातील विविध सेलच्या अध्यक्षांची सुद्धा घोषणा करण्यात आली. महिला मोर्चा अध्यक्ष डॉ. ज्योतीताई दिलीप भुतडा, व्यापारी आघाडी अध्यक्ष ललित खंडेलवाल, दिव्यांग सेल अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण पल्हाडे, किसान आघाडी अध्यक्ष राजेंद्र भिसे, विधी आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. विजय मगर, डॉक्टर सेल अध्यक्ष संतोष भाकरे, ओबीसी सेल अध्यक्ष संदीप तक्रडे, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष राजेंद्र सुरवाडे, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अल्ताफ भाई, उद्योग आघाडी अध्यक्ष गोपाल देशमुख, सहकार आघाडी अध्यक्ष समीर मोरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शंकर पाटील.
कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी अर्पणाताई, नगराध्यक्षा शकुंतलाताई बुच, गटनेते शरद शेठ अग्रवाल, भाजप नेते विजय बापू देशमुख, राजेंद्र शेगोकार, सुधाकर भाऊ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस संतोष बाप्पू देशमुख, तालुका अध्यक्ष विजय भाल तडक, महिला सरचिटणीस सौ. कल्पनाताई मसने, माजी अध्यक्षा डॉ. मंजुषा भुतडा, नगरसेविका खांजोडे ताई ,नगरसेविका मालाबाई ठवे आदींची उपस्थिती होती.