शेगाव नगराध्यक्षांचा पुतळा जाळल्याने भाजपा नगरसेवक संतापले!; पोलिसांना निवेदन देऊन “प्रहार’ पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगराध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून महिलांचा अपमान करणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी संतप्त भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शेगाव शहरच्या ठाणेदारांची भेट घेऊन आज, २१ सप्टेंबरला केली. माजी उपनगराध्यक्ष श्रीमती कचरे यांनी सांगितले, की भारतीय संस्कृतीत महिलांना सन्मान देण्याची परंपरा आहे. महिला नगराध्यक्षांचा प्रतिकात्मक …
 
शेगाव नगराध्यक्षांचा पुतळा जाळल्याने भाजपा नगरसेवक संतापले!; पोलिसांना निवेदन देऊन “प्रहार’ पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगराध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून महिलांचा अपमान करणाऱ्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी संतप्त भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शेगाव शहरच्या ठाणेदारांची भेट घेऊन आज, २१ सप्‍टेंबरला केली.

माजी उपनगराध्यक्ष श्रीमती कचरे यांनी सांगितले, की भारतीय संस्कृतीत महिलांना सन्मान देण्याची परंपरा आहे. महिला नगराध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला साडी नेसवून अशाप्रकारे आग लावणे अतिशय खालची मानसिकता प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिली आहे. शेगाव पालिकेचे भाजपा गटनेते माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल, पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, गजानन जवंजाळ, संजय कलोरे, नगराध्यक्षपती पांडुरंग बुच, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, महिला नगरसेविका व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेगाव शहर पोलीस ठाण्यात जमले होते.