शेगाव नगरपालिका कार्यालयावर दगडफेक!; मुख्य दरवाजाची काच फोडली

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीवर अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नगरपालिकेत रोजप्रमाणे कामकाज सुरू असताना आज, 3 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा एकच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून दरवाजाची काच फोडण्यात आली.घटनेमुळे नगरपालिका कार्यालयातील कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या निषेधार्थ कर्मचार्यांनी …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव नगर पालिका कार्यालयाच्या इमारतीवर अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नगरपालिकेत रोजप्रमाणे कामकाज सुरू असताना आज, 3 फेब्रुवारीला दुपारी साडेबारा एकच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक करून दरवाजाची काच फोडण्यात आली.
घटनेमुळे नगरपालिका कार्यालयातील कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. या घटनेच्या विरोधात कर्मचारी संघटनेतर्फे शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपात तक्रार वजा निवेदन देण्यात आले. आरोपींचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर विजयकुमार आश्रमा, एस. एस. बोबडे, एस. पी. इंगोले, श्री. पालीवाल, श्री. देशमुख यांच्यासह इतर कर्मचार्‍यांच्या सह्या आहेत.