शिवसेनेची खामगाव शहर कार्यकारिणी लवकरच; इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती!
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शहराची नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी २६ सप्टेंबरला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. …
Sep 29, 2021, 16:47 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. शहराची नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांनी २६ सप्टेंबरला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.
लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, तालुकाप्रमुख सुरेश वावगे, विधानसभा मतदारसंघ संघटक हरिदास हुरसाड, युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकार, इंदूताई राणे, नंदू भट्टड, गजानन उटाळे, सुरेश बेलोकार, श्रीराम खेलदार, नंदू बोदडे, धीरज कंठाळे, नीलेश खरात, सुनील नवले, दीपक गायकवाड, अंकित पुरवार आदींची उपस्थिती होती.