शिवशंकरभाऊ खर्‍या अर्थाने निष्काम कर्मयोगी : ह.भ.प. धनेश्‍वर महाराज ढोरे; बुलडाणा लाइव्हच्या निष्काम कर्मयोगी विशेष पुरवणीचे प्रकाशन थाटात

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्यापकतेने निर्विकल्पाने केलेलं कार्य म्हणजे निष्काम कार्य. आजपर्यंत श्री शिवशंकर भाऊंच्या जीवनात जे काही कार्य झालं ते कोणत्याच प्रकारचं विकल्पाने झालं नाही ते निर्विकल्पित झालं. कुण्या समाजासाठी झालं नाही व्यापकतेने झालं. त्यामुळे ते खर्या अर्थाने निष्काम कर्मयोगी ठरतात, असे प्रतिपादन साधक आश्रम धापटीचे ह.भ.प. धनेश्वर महाराज ढोरे यांनी केले. संत …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  ः व्यापकतेने निर्विकल्पाने केलेलं कार्य म्हणजे निष्काम कार्य. आजपर्यंत श्री शिवशंकर भाऊंच्या जीवनात जे काही कार्य झालं ते कोणत्याच प्रकारचं विकल्पाने झालं नाही ते निर्विकल्पित झालं. कुण्या समाजासाठी झालं नाही व्यापकतेने झालं. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निष्काम कर्मयोगी ठरतात, असे प्रतिपादन साधक आश्रम धापटीचे ह.भ.प. धनेश्‍वर महाराज ढोरे यांनी केले.

संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्हने आज, 12 जानेवारीला निष्काम कर्मयोगी या विशेष पुरवणीचे प्रकाशन केले. हा सोहळा शहरातील प्रसिद्ध अशा मथुरा लॉन्समध्ये सकाळी पार पडला. त्यावेळी श्री. ढोरे महाराज बोलत होते.  यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. सुशील महाराज वनवे, यशवंत इंडस्ट्रीजचे संचालक पंढरीनाथ गुंजकर, सामाजिक कार्यकर्ते व भाजप नेते राजेंद्र शेगोकार, मथुरा लॉन्स व अ‍ॅग्रोटेकचे संचालक विनायक भारंबे, समर्थ अकॅडमीचे संचालक पुरुषोत्तम बिलेवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. भूषण दाभाडे, बुलडाणा लाइव्हचे घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर ताकोते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात हभप सुशील महाराज वनवे यांनी श्री. शिवशंकर भाऊंच्या आयुष्यपट सोप्या शब्दांत विषद केला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच बुलडाणा लाइव्हची जी वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे ती अत्यंत आश्‍चर्यस्पद आणि कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. एक लक्ष वाचक अल्पावधीत मिळवून बुलडाणा लाइव्हने मिळणे हा श्रींचा आशीर्वाद आहे. आध्यात्मिक मार्ग आणि धर्मकार्य बुलडाणा लाइव्हने कायम ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सूत्रसंचालन भूषण दाभाडे यांनी केले. यावेळी माऊली सेवा ग्रुपचे अध्यक्ष नितीन कराळे, जायन्ट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष निळकंठ साबळे, मराठा पाटील युवक समितीचे अध्यक्ष श्याम आढाव, राष्ट्रवादीचे नेते राजूभाऊ असोलकार, प्रकाश रहाटे, रतन बघे, मोहन पिंपळे, दीपक सराफ,  गोपाल तायडे, नलुशालीताई भारंबे, मोहरील मॅडम, जुमळे मॅडम, पद्मिनीताई पिंपळे, वंदनाताई शेगावकर, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस शेगाव अध्यक्ष भिकाभाऊ सरवान उपस्थित होते. आभार विनायक भारंबे यांनी मानले.