व्‍यापारी प्रशासनाच्‍या विरोधात उभे ठाकले!; 23 मार्चपासून पाळणार नाहीत आदेश

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद येथील व्यापारी प्रशासनाच्या विरोधात उभे ठाकले असून, उद्या, 23 मार्चपासून प्रशासनाचा आदेश न पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन त्यांचेच अधिकारी करत नसतील तर आम्हीही दुकाने सुरू ठेवू, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, चतुर्भज केला, उपाध्यक्ष …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जळगाव जामोद येथील व्‍यापारी प्रशासनाच्‍या विरोधात उभे ठाकले असून, उद्या, 23 मार्चपासून प्रशासनाचा आदेश न पाळण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या आदेशाचे पालन त्‍यांचेच अधिकारी करत नसतील तर आम्‍हीही दुकाने सुरू ठेवू, अशी भूमिका व्‍यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली आहे.

व्‍यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, चतुर्भज केला, उपाध्यक्ष गौतम भन्‍साळी, एफ. आर. खान, प्रकाश सोळंकी, नीलेश सेदानी आदींनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की शहरातील शासकीय कार्यालयांत गर्दी होत असताना त्‍याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करत आहे. एसटी बसेससुद्धा पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्‍यामुळे केवळ दुकाने बंद ठेवून छोट्या मोठ्या व्‍यापाऱ्यांना आर्थिक संकटात टाकणे योग्‍य नाही. रोजगार, व्‍यापार पूर्वीप्रमाणे सुरू व्‍हायला हवेत. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आता राहिला नाही, अशी भूमिकाही त्‍यांनी मांडली.

…तर त्‍या वाहनांची हवा सोडू!

फिरत्‍या पथकात मर्यादपेक्षा जास्‍त कर्मचाऱ्यांना बसवून कोरोनाविषयक आदेशाचे उल्लंघन झाले असताना नियमानुसार 6 हजार रुपये दंड होणे आवश्यक होते. मात्र केवळ 500 रुपये दंड आकारण्यात आला. याबाबत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. फिरत्‍या पथकाला नियमानुसार दंड न केल्यास 23 मार्चपासून दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यात येतील. व्‍यापाऱ्यांना नाहक त्रास दिला तर वाहनांची हवा सोडून देण्यात येईल, असा इशाराही यावेळी व्‍यापाऱ्यांनी दिला.