विनायकराव भिसे महाराज यांचे देहावसान!; हजारो भाविक शोकसागरात बुडाले!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लासुरा फाट्याजवळील (ता. शेगाव) संतकृपा शांती आश्रमाचे संस्थापक, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान विनायकराव शंकरराव भिसे महाराज (७६) यांचे आज, ३ सप्टेंबरला पहाटे दोनच्या सुमारास शेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते बजरंग बलीचे उपासक होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये त्यांचा शिष्यवर्ग होता. गेल्या काही …
 
विनायकराव भिसे महाराज यांचे देहावसान!; हजारो भाविक शोकसागरात बुडाले!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लासुरा फाट्याजवळील (ता. शेगाव) संतकृपा शांती आश्रमाचे संस्‍थापक, हजारो भाविकांचे श्रद्धास्‍थान विनायकराव शंकरराव भिसे महाराज (७६) यांचे आज, ३ सप्‍टेंबरला पहाटे दोनच्‍या सुमारास शेगाव येथील खासगी रुग्‍णालयात उपचारादरम्‍यान निधन झाले. ते बजरंग बलीचे उपासक होते. केवळ महाराष्ट्रच नव्‍हे तर गुजरात, छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये त्‍यांचा शिष्यवर्ग होता.

विनायकराव भिसे महाराज यांचे देहावसान!; हजारो भाविक शोकसागरात बुडाले!!

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्‍यामुळे शेगावमधील खासगी रुग्‍णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. महाराजांचा जन्‍म ६ जून १९४६ रोजी झाला होता. लहानपणापासूनच त्‍यांना आध्यात्‍मिक क्षेत्राची आवड होती. ते पदवीधर होते. महाराजांनी तळागाळातील लोकांना सेवाभावी वृत्तीने आपलेसे केले होते. त्‍यांनी जिल्ह्यातील अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता. वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून त्‍यांनी अनेक गावांत भागवत सप्‍ताह सुरू केला. या माध्यमातून अनेकांना व्यसनमुक्‍त केले. आज दुपारी एकच्‍या सुमारास त्‍यांच्‍यावर आश्रमातच अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले.

विनायकराव भिसे महाराज यांचे देहावसान!; हजारो भाविक शोकसागरात बुडाले!!