विनामास्‍क फिरत होते, 40 जणांना नांदुऱ्यात बसला दंडम!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस प्रशासन व नगर परिषदेतर्फे आज, 25 मार्च रोजी नांदुरा शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 40 जणांकडून 2000 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधुबन चोक, रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस प्रशासन व नगर परिषदेतर्फे आज, 25 मार्च रोजी नांदुरा शहरात विना मास्‍क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 40 जणांकडून 2000 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधुबन चोक, रेल्वे स्टेशन चौक या ठिकाणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे व नगर परिषद मुख्याधिकारी आशिष बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.