विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू; वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही विजेचा धक्का, शेजाऱ्यांनी वाचवले, मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात काम करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना काल, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नरवेल (ता. मलकापूर) येथे घडली. माधुरी राजेंद्र कोलते (३०, रा. नरवेल, ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. संध्याकाळी स्वयंपाक करत असताना …
 
विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू; वाचवण्यासाठी गेलेल्या पतीलाही विजेचा धक्का, शेजाऱ्यांनी वाचवले, मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात काम करताना विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना काल, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नरवेल (ता. मलकापूर) येथे घडली.

माधुरी राजेंद्र कोलते (३०, रा. नरवेल, ता. मलकापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. संध्याकाळी स्वयंपाक करत असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यावेळी घरात दुसरे कुणीच नव्हते. पती राजेंद्र कोलते घरी आल्यानंतर त्यांनी पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. आरडाओरड करून तेही पत्नीला वाचवायला गेले असता त्यांना विजेचा धक्का बसला. मात्र शेजाऱ्यांनी धावत येऊन मेनस्वीच बंद केल्याने राजेंद्र कोलते यांचा जीव वाचला. माधुरी यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.