वडील घरातून निघून गेले…मुलाची पोलिसांत धाव!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५५ वर्षीय व्यक्ती घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या मुलाने जलंब पोलीस ठाण्यात केली आहे. शंकर हरीनाथ घोंगळे (रा. दौंदवाडा, ता. खामगाव) असे बेपत्ता झालेल्यांचे नाव असून, वैभव शंकर घोगळे (२५) यांनी तक्रारीत म्हटले आहे, की ३ सप्टेंबरला वडील शंकर घोंगळे हे कोणास काहीएक न सांगता घरून …
 
वडील घरातून निघून गेले…मुलाची पोलिसांत धाव!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५५ वर्षीय व्‍यक्‍ती घरातून निघून गेल्याची तक्रार त्‍यांच्‍या मुलाने जलंब पोलीस ठाण्यात केली आहे. शंकर हरीनाथ घोंगळे (रा. दौंदवाडा, ता. खामगाव) असे बेपत्ता झालेल्यांचे नाव असून, वैभव शंकर घोगळे (२५) यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की ३ सप्‍टेंबरला वडील शंकर घोंगळे हे कोणास काहीएक न सांगता घरून निघून गेले आहेत. अकोल्यातील डाॅ. सुजय पाटील यांच्‍याकडे त्‍यांच्‍यावर उपचार सुरू होते. रंग निमगोरा, उंची साधारणतः ५ फूट २ इंच, बांधा सडपातळ, डोक्यात भगवी टोपी, पिवळ्या रंगाचा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा असे त्‍यांचे वर्णन आहे.