लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका ः नांदुरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या नव्या आदेशानुसार कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे असा केला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन 84 दिवस उलटलेल्या नागरिकांनीच आता लसीकरण केंद्रावर यावे. कोव्हॅक्सिजन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या लसीचे अंतर 45 दिवस …
May 15, 2021, 21:02 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या नव्या आदेशानुसार कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे असा केला आहे. त्यामुळे पहिला डोस घेऊन 84 दिवस उलटलेल्या नागरिकांनीच आता लसीकरण केंद्रावर यावे. कोव्हॅक्सिजन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या लसीचे अंतर 45 दिवस आवश्यक आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना केले आहे.