राष्ट्रवादीच्या आंदोलनाने जिल्हाभर माहोल… बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवली चूल!; जळगाव जामोदमध्ये दुचाकीची अंत्ययात्रा, शेगावमध्ये घातले लोटांगण!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गॅस आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर चूल पेटवून व पोळ्या टाकून अनोखे आंदोलन केले. यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
केंद्र सरकारने १ जुलैपासून गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे गृहिणींचे बजेड कोलमडले. पेट्रोल शंभरी पार तर डिझेलसाठी प्रतिलिटर ९५-९७ रुपये मोजावे लागत असल्याने सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, नरेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, सुमित सरदार, पी. एम. जाधव, अनुजा सावळे, महेश देवरे, अमोल वानखेडे, जि.प. समाजकल्याण सभापती पूनमताई राठोड, प्रभाताई चिंचोले, निर्मलाताई तायडे, सत्तार कुरेशी यांचा सहभाग होता.
जळगाव जामोदमध्ये आंदोलन
जळगाव जामोद (ज्ञानेश्वर ताकोते) ः जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तत्पूर्वी मोटारसायकलची अंत्ययात्रा काढण्यात आली. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत दाभाडे, प्रकाश ढोकने, अॅड. संदीप उगले, एम. डी. साबीर, रंगाराव देशमुख, रमेश उमाळे, विश्वास पाटील, अजहर देशमुख, एजाज देशमुख, अब्दुल जहीर, पराग अवचार, ईरफान खान, आशिष वायझोडे, अताउल्लाह पठाण, सिद्धू हेलोडे, संजय देशमुख, वर्षाताई वाघ, सुहास वाघ, योगेश कुंवर, बंटी शंकपाल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
देऊळगाव राजात आंदोलन
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे) ः बसस्थानक चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. नंतर पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवले. आंदोलनात तालुकाध्यक्ष राजू सिरसाट, शहराध्यक्ष अप्रित मिनासे, गंगाधर जाधव, तुकाराम खांडेभराड, गणेश बुरुकूल, उध्दव म्हस्के, विष्णू रामाणे, एल. एम. शिंगणे, दिलीप झोटे, गणेश सवडे, दत्ता टकले, कविश जिंतूरकर, प्रमोद घोंगे, अरविंद खांडेभराड, पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई बुरुकूल, सरस्वती टेकाळे, मंदाताई शिंगणे भागुबाई कोल्हे, सुनिता सवडे, अर्चना कोल्हे अादी सहभागी झाले होते.
शेगावमध्ये लोटांगण आंदोलन
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज, ५ जुलैला शेगावमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. शेगाव तहसीलसमोर लोटांगण घालण्यात आले. तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ लवकरात लवकर कमी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. आंदोलनात शहराध्यक्ष मनोज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, विनायक गवई, डॉ. धीरज राजपूत, ज्ञानेश्वर गायकवाड, श्रीधर गायकवाड, विधी विभागाचे शहराध्यक्ष ॲड. पोखरे, गोपाल भोंगरे, अहमद खान, ज्ञानेश्वर ताकोते आदी सहभागी झाले होते.