यंदाही श्रींची पालखी पंढरपूरला जाणार नाही…
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य सरकारने राज्यातील केवळ १० मानाच्या पालख्यांनाच पंढरपूर वारीची परवानगी दिली आहे. यात शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचा समावेश नाही. त्यामुळे यंदाही श्रींची पालखी पंढरपूरला जाणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारी म्हणून यंदाही वारीला परवानगी दिलेली नाही. पालख्यांनाही परवानगी दिलेली नाही. पालखीचा जुना …
Jul 4, 2021, 10:16 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य सरकारने राज्यातील केवळ १० मानाच्या पालख्यांनाच पंढरपूर वारीची परवानगी दिली आहे. यात शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचा समावेश नाही. त्यामुळे यंदाही श्रींची पालखी पंढरपूरला जाणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने खबरदारी म्हणून यंदाही वारीला परवानगी दिलेली नाही. पालख्यांनाही परवानगी दिलेली नाही. पालखीचा जुना व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे संस्थानने स्पष्टीकरण देऊन अफवा आणि अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.