मेंढ्याच्या कळपावर वन्यप्राण्याचा हल्ला; दोन मेंढ्या फस्त; एक जखमी, सहा बेपत्ता, संग्रामपूर तालुक्यातील घटना
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वन्यप्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यात दोन मेंढ्या ठार तर एक जखमी झाली. सहा मेंढ्या बेपत्ता झाल्या आहेत. आज, २१ जुलैला सकाळी ही घटना सायखेड (ता. संग्रामपूर) येथे समोर आली. सायखेड शिवारात साबू भिकाजी केदार यांचा मेंढ्यांचा कळप आहे. काल रात्रीदरम्यान वन्यप्राण्याने मेंढ्यांचा कळपावर हल्ला चढविला होता. आज सकाळी वनविभागाला …
Jul 21, 2021, 20:16 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वन्यप्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यात दोन मेंढ्या ठार तर एक जखमी झाली. सहा मेंढ्या बेपत्ता झाल्या आहेत. आज, २१ जुलैला सकाळी ही घटना सायखेड (ता. संग्रामपूर) येथे समोर आली. सायखेड शिवारात साबू भिकाजी केदार यांचा मेंढ्यांचा कळप आहे. काल रात्रीदरम्यान वन्यप्राण्याने मेंढ्यांचा कळपावर हल्ला चढविला होता. आज सकाळी वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. वन्यप्राण्यांच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.