माहितीचा अधिकार…मलकापूरच्या तत्कालिन नगर अभियंत्याला 25 हजारांचा दंड
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकासकामांची माहिती मागितल्यानंतर मुदतीत न दिल्याने मलकापूर नगर परिषदेच्या तत्कालिन नगर अभियंता नंदकिशोर येवतकर यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी दिले आहेत. नंदकिशोर येवतकर यांना माहिती न दिल्याचा अशाच प्रकरणांमध्ये आतापर्यंत 2 लाखांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. एस. ए. रऊफ यांनी …
Apr 16, 2021, 20:14 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विकासकामांची माहिती मागितल्यानंतर मुदतीत न दिल्याने मलकापूर नगर परिषदेच्या तत्कालिन नगर अभियंता नंदकिशोर येवतकर यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश राज्य माहिती आयुक्त अमरावती यांनी दिले आहेत. नंदकिशोर येवतकर यांना माहिती न दिल्याचा अशाच प्रकरणांमध्ये आतापर्यंत 2 लाखांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते ॲड. एस. ए. रऊफ यांनी मलकापूर नगर परिषदेकडे वल्लीचौक ते पारपेठपर्यंतच्या पुला कामाची माहिती मागितली होती. ही माहिती प्रथम अपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांनी देणे अपेक्षित होते. मात्र विहित मुदतीच्या आत माहिती न दिल्याने तत्कालिन नगर अभियंता तथा जनमाहिती अधिकारी नंदकिशोर येवतकर यांच्याकडून 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.