माटरगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः माटरगाव (ता. शेगाव) येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात 30 एप्रिलला आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला. सामूहिक ध्यान, मंदिराची स्वच्छता, सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. घरीच सामुदायिक प्रार्थना घेऊन कोरोनाच्या संकटातून देशाला सावरण्याचे साकडे …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः माटरगाव (ता. शेगाव) येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात 30 एप्रिलला आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला.

सामूहिक ध्यान, मंदिराची स्वच्छता, सामुदायिक प्रार्थना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आदी कार्यक्रम घेण्यात आले. घरीच सामुदायिक प्रार्थना घेऊन कोरोनाच्या संकटातून देशाला सावरण्याचे साकडे घालण्यात आले. मनोहर कुसुंबे यांनी महाराजांचे जीवन चरित्र सांगितले. एकनाथ शेगोकार, राम देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रधर्म युवा मंच केंद्रीय समितीच्या माध्यमातून गावोगावी राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमात सहभागी कार्यकर्ते सामाजिक अंतर राखून व मास्‍क लावून सहभागी झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किसनराव दळवी, रामकृष्ण मार्के, प्रल्हाद वाघ, मनोहर कुसुंबे, एकनाथ शेगोकार, दिलीप जाधव आदींसह गावकरी उपस्थित होते.