मलकापूरमध्ये व्यापाऱ्यांचे उपोषण, कडक निर्बंध मागे घेण्यासाठी पोटतिडिक!
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्यापाऱ्यांच्या मुळावर उठलेले जाचक कडक निर्बंध मागे घेऊन दिलासा द्यावा, या मागणीसाठी मलकापूर येथे चेंबर्स ऑफ कॉमर्स संघटनेने उपविभागीय कार्यालयासमोर आज, 9 एप्रिलला उपोषण केले.
दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने व्यापारी हवालदील झाले असून, कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. त्यांची मानसिक अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे कडक निर्बंध मागे घेऊन दुकाने उघडण्यास काही तास का होईना परवानगी द्यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. आंदोलनात मनिष लखानी, रूपेश चौधरी, रूपेश श्रीश्रीमाळ, मिलिंद डवले, गिरीश वाधवानी, समीर तुपकरी, गोपाल मालपानी, नीलेश संचेती, मोहन पाचपांडे, सन्मती जैन, पंकजा मुंदडा, अनिल कोचर, पारसमल जैन, कैलास वर्मा, संजय जैस्वाल, प्रमोद पारख, ज्ञानदेव तायडे आदी व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलनाला माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.