मनमानी कारभार भोवला! येऊलखेडचे सरपंच पायउतार!!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येऊलखेड (ता. शेगाव) येथील सरपंच बळराम तायडे यांच्यावर सहा ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव विशेष सभेत पारित झाला आहे. एकूण सदस्यसंख्या 7 असून, थेट जनतेतून श्री. तायडे सरपंच झाले होते. मात्र मनमानी कारभार आणि पदाच्या दुरुपयोगचा ठपका अन्य सदस्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. यावेळी सदस्य प्रकाश गवई, रामकृष्ण …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः येऊलखेड (ता. शेगाव) येथील सरपंच बळराम तायडे यांच्‍यावर सहा ग्रामपंचायत सदस्‍यांनी आणलेला अविश्वास ठराव विशेष सभेत पारित झाला आहे. एकूण सदस्‍यसंख्या 7 असून, थेट जनतेतून श्री. तायडे सरपंच झाले होते. मात्र मनमानी कारभार आणि पदाच्‍या दुरुपयोगचा ठपका अन्य सदस्‍यांनी त्‍यांच्‍यावर ठेवला होता. यावेळी सदस्‍य प्रकाश गवई, रामकृष्ण काळे, गोकर्णाबाई धंदर, शिवाजी माळी, योगिता माळी, रत्‍नाबाई नागे उपस्‍थित होत्‍या. सातव्‍या सदस्‍या ज्‍योती बिसेन सभेला गैरहजर होत्‍या.