मतमोजणीसाठी 14 टेबल, 15 फेर्या… नांदुरा तहसीलचे नियोजन
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, 18 जानेवारीला सकाळी 9 वाजेपासून नांदुरा तहसील कार्यालयात होणार आहे. यासाठी एकूण 14 टेबलची रचना केली असून, जवळपास 15 फेर्यांत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. अशी होणार मतमोजणी… टेबल क्रमांक …
Jan 17, 2021, 17:59 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या, 18 जानेवारीला सकाळी 9 वाजेपासून नांदुरा तहसील कार्यालयात होणार आहे. यासाठी एकूण 14 टेबलची रचना केली असून, जवळपास 15 फेर्यांत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.
अशी होणार मतमोजणी…
- टेबल क्रमांक 1 ः पोटळी, नायगाव, वाडी, वडी
- टेबल क्रमांक 2 ः वडनेर भोलजी, डिघी
- टेबल क्रमांक 3 ः विटाळी, धानोरा वि., सिरसोडी, काटी
- टेबल क्रमांक 4 ः सावरगाव नेहू, मोमीनाबाद, टाकळी, खेडगाव, जिगाव
- टेबल क्रमांक 5 ः दहिगाव, इसबापूर, खुमगाव
- टेबल क्रमांक 6 ः चांदुरबिस्वा, हिंगणे गव्हाड
- टेबल क्रमांक 7 ः वसाळी बुद्रूक, धानोरा बुद्रूक, वडाळी
- टेबल क्रमांक 8 ः महाळुंगी, खैरा, लोणवडी
- टेबल क्रमांक 9 ः खडतगाव, पिंपळखुटा धांडे, माळेगाव गोंड, शेलगाव मुकुंद
- टेबल क्रमांक 10 ः जवळा बाजार, बेलुरा, मेंढळी
- टेबल क्रमांक 11 ः तांदूळवाडी, शेंबा बुद्रूक, टाकरखेड
- टेबल क्रमांक 12 ः येरळी, बेलाड, दादगाव, नारखेड
- टेबल क्रमांक 13 ः अमलपूर, पळसोडा, मामुलवाडी
- टेबल क्रमांक 14 ः भुईशेंगा, आंबोडा, रसुलपूर
15 फेर्यांतून होणार जाहीर
जवळपास 15 फेर्यांतून सर्व निकाल दिला जाईल, असे नायब तहसीलदार संजय मार्कंड यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले.