भाजपा महिला आघाडीची शेगावमध्ये जिल्हा बैठक

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील हॉटेल रसिकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेची जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. प्रदेशाध्यक्षा ऊमाताई खापरे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला प्रदेश महामंत्री सौ. अश्विनीताई जिचकार, प्रदेश सचिव सौ. जयाताई मनातकार, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. सुरेखाताई लुंगारे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष सिंधुताई …
 
भाजपा महिला आघाडीची शेगावमध्ये जिल्हा बैठक

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव येथील हॉटेल रसिकामध्ये भारतीय जनता पक्षाच्‍या महिला शाखेची जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. प्रदेशाध्यक्षा ऊमाताई खापरे यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले. बैठकीला प्रदेश महामंत्री सौ. अश्विनीताई जिचकार, प्रदेश सचिव सौ. जयाताई मनातकार, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. सुरेखाताई लुंगारे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष सौ. नंदिनीताई साळवे, सौ. अपर्णाताई कुटे, ऊमाताई तायडे आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्‍थिती होती.