बायको बाहेर अन्‌ दुसरी तरुणी बेडरूममध्ये!; इंजिनिअर पतीचा इंजिनिअर पत्‍नीसमोर व्याभिचार!!; शीतल, जान्हवी, रेणुका तीन तरुणींसोबत रासलीला अन्‌ पत्‍नीच्‍या आयुष्याचा खेळखंडोबा!; खामगावमध्ये पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध केला गुन्‍हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वतःला उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या वेब डेव्हलपर इंजिनिअरने इंजिनिअर पत्नीचा अवघ्या ११ महिन्यांच्या संसारात अतोनात छळ मांडला. त्याचे तिघींसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्यामुळे पत्नीला दोनदा गर्भपात करावा लागला. छळ असह्य झाल्याने पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंजली प्रशांत तुपलोंढे (२२) या विवाहितेने याप्रकरणात …
 
बायको बाहेर अन्‌ दुसरी तरुणी बेडरूममध्ये!; इंजिनिअर पतीचा इंजिनिअर पत्‍नीसमोर व्याभिचार!!; शीतल, जान्हवी, रेणुका तीन तरुणींसोबत रासलीला अन्‌ पत्‍नीच्‍या आयुष्याचा खेळखंडोबा!; खामगावमध्ये पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध केला गुन्‍हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वतःला उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या वेब डेव्हलपर इंजिनिअरने इंजिनिअर पत्नीचा अवघ्या ११ महिन्यांच्या संसारात अतोनात छळ मांडला. त्याचे तिघींसोबत अनैतिक संबंध होते. त्याच्यामुळे पत्नीला दोनदा गर्भपात करावा लागला. छळ असह्य झाल्याने पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अंजली प्रशांत तुपलोंढे (२२) या विवाहितेने याप्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंजली स्वतः इंजिनिअर आहे. आईवडिलांनी मोलमजुरी करून तिला उच्चशिक्षण दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. ३० जानेवारी २०२० रोजी नाशिक येथील वेब डेव्हलपर इंजिनिअर असलेल्या प्रशांत तुपलोंढे याच्याशी तिचे लग्न झाले. लग्नात वडिलांनी ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला. लग्नानंतर तिला दिवस गेले. मात्र आर्थिक अडचणीचे कारण सांगून तिला गर्भपात करायला लावला. लग्नात खर्च कमी केला, असे टोमणे तिला मारले जात होते. प्रशांतचे शीतल, जान्हवी, रेणुका अशा तीन मुलींसोबत विवाहबाह्य संबंध होते.

प्रशांत जान्हवीसोबत बेडरूममध्ये झोपायचा. सोमवार ते शुक्रवार प्रशांत मुंबईमध्ये राहायचा. तिथे रेणुकासोबत त्याचे संबंध होते. अधूनमधून शीतलशी तो प्रेमाच्या गप्पा मारायचा. तिला भेटायचा. ही बाब जेव्हा अंजलीने सासू- सासऱ्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले की, हे मोठे शहर आहे. इथे असं चालतंच. तू खेड्यातली असल्याने तुला कळत नाही. आमचा मुलगा मर्द आहे. त्याचा तो अधिकारच आहे. सासू- सासऱ्यांच्या या उत्तराने अंजलीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत अंजली माहेरी खामगावला आली. ऑक्टोबरमध्ये मध्यस्थांनी समजूत काढल्याने अंजली पुन्हा नाशिकला गेली. मात्र तरीही प्रशांतच्या वागण्यात काही बदल झाला नाही. अंजलीला जेवण कमी देणे, उपाशी ठेवणे असा अत्याचार सुरू झाला. तिला पत्नीचे प्रेम न देता रेणुका, शीतल व जान्हवीला जवळ धरणे असा उद्योग प्रशांतचा सुरू होता. याच काळात अंजली प्रशांतमुळे दुसऱ्यांदा गर्भवती राहिली.

नोव्हेंबरमध्ये तिचे आईवडील तिला नाशिकला भेटायला आले तेव्हा तुमच्या मुलीला नाशिकला ठेवायचे असेल तर गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये द्या नाहीतर तिला घेऊन जा, असे सासरच्यांनी सुनावले. सासरच्यांची अवाजवी मागणी पूर्ण करू न शकल्याने अंजलीला घरातून हाकलून लावण्यात आले. सासरी झालेल्या छळामुळे तिचा गर्भ खराब झाला. त्यामुळे तिला नाईलाजाने ११ महिन्यांत दुसऱ्यांदा गर्भपात करावा लागला. अंजलीच्या वडिलांनी जेव्हा गर्भपात केल्याची माहिती प्रशांतला दिली, तेव्हा तुमची मुलगीच व्यभिचारी असल्याचा आरोप प्रशांतने केला. माझ्यासारख्या सुशिक्षित मुलीवर जर असे अत्याचार होत असतील तर अशिक्षित मुलींनी कोठे जावे, असा सवालही अंजलीने तक्रारीत शेवटी केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अंजलीचा पती प्रशांत तुपलोंढे, सासरा रामदास तुपलोंढे, सासू आशा तुपलोंढे व दीर मिलिंद तुपलोंढे (सर्व रा. शिवाजीनगर, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.