पोत्यात बांधलेल्या अवस्‍थेतील महिलेचा मृतदेह आढळला!; अनैतिक संबंधातून खुनाचा संशय, पती वारल्यानंतर राहत होती एका पुरुषासोबत!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली ३८ वर्षीय महिलेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. ७ ऑक्टोबरला सायंकाळी आढळलेल्या मृतदेहाचे ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशयही पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. पिंकी ऊर्फ सुरेखा नितवणे (रा. हिवरा, ता. मुक्ताईनगर, …
 
पोत्यात बांधलेल्या अवस्‍थेतील महिलेचा मृतदेह आढळला!; अनैतिक संबंधातून खुनाचा संशय, पती वारल्यानंतर राहत होती एका पुरुषासोबत!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली ३८ वर्षीय महिलेचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला आहे. ७ ऑक्टोबरला सायंकाळी आढळलेल्या मृतदेहाचे ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशयही पोलीस सूत्रांनी व्यक्‍त केला आहे.

पिंकी ऊर्फ सुरेखा नितवणे (रा. हिवरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या महिलेचा हा मृतदेह आहे. पंधरा वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. ८ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. तेव्हापासून ती नंदू उर्फ कैलास जवंजाळ (रा. हिवरा, ता. मुक्ताईनगर) याच्यासोबत राहत होती. काही महिन्यांपूर्वी ती नंदुसोबत टाकळी पारस्कार (ता. जळगाव जामोद) येथे राहायला आली होती.

तेथील संजय पारस्कार यांच्या शेतात दोघे राहत होते व मजुरी करत होते. मात्र ४ ऑक्टोबरपासून दोघेही फरार होते, असे संजय पारस्कार यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी पारस्कार यांच्या शेतातील नंदूच्या सामानाची झाडाझडती घेतली त्यावरून मृतक महिलेची ओळख पटली. मात्र नंदू फरार असल्याने नंदूनेच तिचा खून केला असावा, असाही संशय पोलिसांना आहे. मृत महिलेचे माहेर जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव आहे. पोलिसांनी माहेरच्या लोकांना याबाबत माहिती दिली. मात्र माहेरच्या लोकांनी अंत्यसंस्कार करायला नकार दिल्याने जळगाव जामोद पोलिसांनी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.