पुन्‍हा दीपक जाधव झाले खामगाव बाजार समितीचे प्रशासक

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून पुन्हा दीपक जाधव यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी केली आहे. बाजार समितीवर काँग्रेस- भारिप बमसंची सत्ता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सभापती संतोष टाले यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले होते. सत्ताधाऱ्यांविरुद्ध तक्रारीही झाल्या होत्या. त्यातच …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्‍हणून पुन्‍हा दीपक जाधव यांची नियुक्‍ती जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी केली आहे.

बाजार समितीवर काँग्रेस- भारिप बमसंची सत्ता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर सभापती संतोष टाले यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्‍यामुळे राजकीय आरोप-प्रत्‍यारोप रंगले होते. सत्ताधाऱ्यांविरुद्ध तक्रारीही झाल्या होत्‍या. त्‍यातच संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला. दीड वर्षापासून समितीवर प्रशासक नियुक्‍त आहेत. आधी महेश कृपलानी मुख्य प्रशासक होते. नंतर दीपक जाधव यांना मुख्य तर त्‍यांना सहायक म्‍हणून श्री. साळुंके यांची नियुक्‍ती झाली. जाधव यांच्‍या नियुक्‍तीवर आमदार आकाश फुंडकरांनी आक्षेप घेतल्याने पुन्‍हा कृपलानींची नियुक्‍ती झाली होती. आता पुन्‍हा दीपक जाधव मुख्य प्रशासक झाले आहेत.पुन्‍हा दीपक जाधव झाले खामगाव बाजार समितीचे प्रशासक