पिंपळगाव काळे येथे गोठ्याला आग; सुदैवाने जिवीत हानी नाही
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथे आज, 18 मार्चला दुपारी 2 च्या सुमारास गोठ्याला अचानक लाग लागली. सुदैवाने त्यावेळी गोठ्यात जनावरे अथवा शेतकरी कुणीही नव्हते. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. अंगणवाडीच्या बाजूलाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा गोठा तयार केला …
Mar 18, 2021, 17:48 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथे आज, 18 मार्चला दुपारी 2 च्या सुमारास गोठ्याला अचानक लाग लागली. सुदैवाने त्यावेळी गोठ्यात जनावरे अथवा शेतकरी कुणीही नव्हते. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. अंगणवाडीच्या बाजूलाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा गोठा तयार केला होता. आगीत तो पूर्णपणे खाक झाला आहे. आग कशामुळे लागली हे वृत्त लिहिपर्यंत समोर येऊ शकले नाही.