पिंपळखुटा खुर्दसाठी टँकर मंजूर, खेपांचा हिशोब ठेवा
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील 507 लोकसंख्येकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकर गावाला रोज 19 हजार 480 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे …
Jun 1, 2021, 09:13 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील 507 लोकसंख्येकरिता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकर गावाला रोज 19 हजार 480 लीटर पाण्याचा पुरवठा करणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी (महसूल) बुलडाणा यांनी कळविले आहे.