पाचही तालुक्यातही सर्वेक्षण सकात्मक!; खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे भिजत घोंगडे मार्गी लागण्याची शक्यता!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने केले असून, जालना, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली व खामगाव या पाच तालुक्यांत हे सर्वेक्षण सुरू होते. संतनगरीतही पथकाने पाहणी केली. रेल्वेस्थानक परिसरात पथकासोबत असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की रेल्वेमार्ग संतनगरी शेगावपर्यंत वाढविण्यात यावा, अशी …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव- जालना रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण मध्य रेल्वेच्या विशेष पथकाने केले असून, जालना, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली व खामगाव या पाच तालुक्यांत हे सर्वेक्षण सुरू होते. संतनगरीतही पथकाने पाहणी केली.

रेल्वेस्थानक परिसरात पथकासोबत असलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की रेल्वेमार्ग संतनगरी शेगावपर्यंत वाढविण्यात यावा, अशी मागणी आपण रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. पथकातील अधिकारी एस. सी. जैन यांनी सांगितले, की केवळ सर्वेक्षण करून न थांबता प्रत्यक्षात रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. सर्वेक्षण सकारात्मक झाल्याचे ते म्हणाले. यावेळी खामगावचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील मिरगे, शिवसेना नगरसेवक दिनेश शिंदे, तालुकाप्रमुख उमेश अवचार, भाजप तालुकाध्यक्ष विजय भालतिडक, संतोष देशमुख, शेगाव रेल्वे प्रबंधक पी. एम. पुंडकर आदी उपस्थित होते.अधिकार्‍यांनी घेतला श्रींचा महाप्रसादसर्वेक्षण करणार्‍या रेल्वेच्या अधिकार्‍यांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला.