नावानी मंगल कार्यालयात अवैध बांधकाम?; नांदुऱ्यातील प्रकार; न.प. मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील मुख्य बाजारपेठेतील सिनेमा रोड भागातील नावानी मंगल कार्यालयात अवैध बांधकाम सुरू असल्याची तक्रार नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही अशाप्रकारे बांधकाम होत आहे आणि याकडे मुख्याधिकाऱ्यांचे दूर्लक्ष होत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तक्रारकर्ते रमेश नावानी यांनी बुलडाणा लाइव्हला पाठवले. या निवेदनात त्यांनी …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  नांदुरा शहरातील मुख्य बाजारपेठेतील सिनेमा रोड भागातील नावानी मंगल कार्यालयात अवैध बांधकाम सुरू असल्याची तक्रार नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. न्‍यायालयाचा स्‍थगिती आदेश असतानाही अशाप्रकारे बांधकाम होत आहे आणि याकडे मुख्याधिकाऱ्यांचे दूर्लक्ष होत असल्याचे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तक्रारकर्ते रमेश नावानी यांनी बुलडाणा लाइव्‍हला पाठवले. या निवेदनात त्‍यांनी म्‍हटले आहे, की श्री शांतीसुंदर नावानी स्‍मृती भवन अर्थात नावानी मंगल कार्यालयात अवैध बांधकाम सुरू आहे. अशोक नावानी आणि शैलेश नावानी हे दोघे मिळून हे बांधकाम न्‍यायालयाचा मनाई आदेश असतानाही करत आहेत. यामुळे न्‍यायालयाच्‍या आदेशाचाही भंग होत  हे बांधकाम तातडीने थांबवावे, अशी मागणी रमेश नावानी यांनी केली आहे. त्‍यांनी निवेदनाच्‍या प्रती जिल्‍हाधिकारी, तहसीलदार, ठाणेदारांनाही दिल्या आहेत.