नांदुरा पंचायत समिती उपसभापती निवडणूक 17 मार्चला
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली असून, 17 मार्चला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही निवड होईल. निवडणूक प्रक्रियचे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून, सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. त्याचदिवशी दुपारी 2 वाजता सभेचे कामकाज सुरू होईल. निवडणुकीची प्रक्रिया चालू करण्यात …
Mar 10, 2021, 21:21 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली असून, 17 मार्चला तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही निवड होईल. निवडणूक प्रक्रियचे व्हिडिओ चित्रीकरण होणार असून, सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील. त्याचदिवशी दुपारी 2 वाजता सभेचे कामकाज सुरू होईल. निवडणुकीची प्रक्रिया चालू करण्यात येईल. नवीन उपसभापती कोण होणार आहे, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. सध्या शिवसेनेच्या सुनीताताई संतोष डिवरे सभापती आहेत.