नांदुरा ते सिंदखेडराजा पदयात्रा जाणार; सहभागी व्हायचे?

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 12 जानेवारीला माँ जिजाऊ जन्मोत्सव असून, यानिमित्त माँ जिजाऊ- सावित्री विचार मंच प्रचार पायी यात्रा 6 ते 11 जानेवारी दरम्यान नांदुरा ते सिंदखेडराजा काढली जाणार आहे. 6 दिवस संध्याकाळी मुक्काम करत नांदुरा खुर्द- पिंपळगाव राजा- बोथा – वरवंड फाटा-डोगरखंडाळा- चिखली शहर- मेरा फाटा- देऊळगाव मही- मातृतीर्थ सिंदखेडराजा …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 12 जानेवारीला माँ जिजाऊ जन्मोत्सव असून, यानिमित्त माँ जिजाऊ- सावित्री विचार मंच प्रचार पायी यात्रा 6 ते 11 जानेवारी दरम्यान नांदुरा ते सिंदखेडराजा काढली जाणार आहे.

6 दिवस संध्याकाळी मुक्काम करत नांदुरा खुर्द- पिंपळगाव राजा- बोथा – वरवंड फाटा-डोगरखंडाळा- चिखली शहर- मेरा फाटा- देऊळगाव मही- मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे 11 जानेवारीला संध्याकाळी जिजामाता विद्यालयात पदयात्रा पोहोचणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी माँ जिजाऊ सावित्री विचार मंच नांदुराचे संयोजक अशोक घानोकर 9763055071, अमर पाटील, शुभम ढवळे, सौ. सारिकाताई राजेश डागा, सौ. उषाताई शिंत्रे, सौ. सरिताताई प्रकाश बावस्कर, सौ. सीमाताई भगत यांच्या वतीने कळविण्यात आले.