नांदुरा तहसीलमध्ये काम बंद आंदोलन

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तहसील कार्यालयात आज, 27 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर आरक्षण सोडत झाल्यानंतर काम बंद आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ला विरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार श्री. …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तहसील कार्यालयात आज, 27 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर आरक्षण सोडत झाल्यानंतर काम बंद आंदोलन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर रेती माफियांनी केलेल्या भ्याड हल्ला विरोधात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार श्री. मार्कड यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी झाले. त्यामुळे दुपारनंतर तहसील कार्यालय बंद राहिल्याचे चित्र होते.