नांदुरा : कोठारी इंग्रजी शाळेत स्वातंत्र्य दिन कार्यक्रम
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोठारी इंग्रजी शाळेत स्वातंत्र्य दिन हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजवंदन करून साजरा झाला. यानिमित्त विविध ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमती उमादेवी कोठारी होत्या. वीरपत्नी श्रीमती सुषमादेवी संजयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे सचिव विठ्ठल कोठारी, संचालिका सौ. राजश्री कोठारी, जनार्दन वावगे, …
Aug 17, 2021, 15:52 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोठारी इंग्रजी शाळेत स्वातंत्र्य दिन हा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजवंदन करून साजरा झाला. यानिमित्त विविध ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी श्रीमती उमादेवी कोठारी होत्या. वीरपत्नी श्रीमती सुषमादेवी संजयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे सचिव विठ्ठल कोठारी, संचालिका सौ. राजश्री कोठारी, जनार्दन वावगे, मुख्याध्यापिका सौ. वर्षा कुलकर्णी, उपमुख्याध्यापक प्रकाश पवार, पर्यवेक्षक श्री. बाहेकर, प्राचार्य किशोर काकडे, उपप्राचार्य संतोष डोडिया, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. विरकर, श्रीमती फाळके, प्रशासक अनिरुध्द अवचार, सौ. भट, सौ. लोणाग्रे, सौ. डिवरे, सौ. भोपळे आदींची उपस्थिती होती.