नांदुरा ः आचारसंहिता भंग करणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करा ः उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांचे आदेश

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी आज, 7 जानेवारीला नांदुरा तहसील कार्यालयात आचार संहितेबाबत सभा घेतली. तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांनी सूचना दिल्या. आचार संहितेमध्ये काय करावे व काय करू नये तसेच सरकारी इमारत, सरकारी टॉवर व महावितरणच्या पोलवर कोणीही बॅनर, पोस्टर लावणार नाही …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ग्रामपंचायत निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी आज, 7 जानेवारीला नांदुरा तहसील कार्यालयात आचार संहितेबाबत सभा घेतली. तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांनी सूचना दिल्या. आचार संहितेमध्ये काय करावे व काय करू नये तसेच सरकारी इमारत, सरकारी टॉवर व महावितरणच्या पोलवर कोणीही बॅनर, पोस्टर लावणार नाही याची दखल घ्यावी. कोणी लावल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, ठाणेदार श्री. नाईकनवरे, महावितरण अभियंता श्री. मिसाळ, कृषी अधिकारी श्री. अंगाईत व इतर अधिकारी हजर असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय मार्कड यांनी बुलडाणा लाईव्हला दिली.