धक्कादायक… दोन मैत्रिणींच्‍या मदतीने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार!; २३ वर्षीय विवाहित तरुणाला मलकापूरमध्ये अटक, मदत करणाऱ्या दोन युवतींविरुद्धही गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन युवतींच्या मदतीने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २३ वर्षीय विवाहित तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी काल, १७ ऑक्टोबरला रात्री अटक केली. त्याला मदत करणाऱ्या दोन्ही युवतींविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण गजानन बोरसे असे संशयिताचे नाव आहे. मलकापूर शहरातील माता महाकालीनगरात पीडित मुलगी राहते. भूषण तिच्याच शेजारी राहतो. …
 
धक्कादायक… दोन मैत्रिणींच्‍या मदतीने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार!; २३ वर्षीय विवाहित तरुणाला मलकापूरमध्ये अटक, मदत करणाऱ्या दोन युवतींविरुद्धही गुन्‍हा दाखल

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन युवतींच्‍या मदतीने १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या २३ वर्षीय विवाहित तरुणाला मलकापूर शहर पोलिसांनी काल, १७ ऑक्‍टोबरला रात्री अटक केली. त्‍याला मदत करणाऱ्या दोन्‍ही युवतींविरुद्धही गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

भूषण गजानन बोरसे असे संशयिताचे नाव आहे. मलकापूर शहरातील माता महाकालीनगरात पीडित मुलगी राहते. भूषण तिच्‍याच शेजारी राहतो. तो विवाहित असून, एका लेकराचा बाप आहे. शेजारच्या दोन युवतींनी पीडितेला वेळोवेळी त्‍यांच्‍या घरी बोलावून भूषणशी बोलण्यास बाध्य केले. त्‍यानंतर भूषणने तिला गांधी चौकातील त्‍याच्‍या आदर्श हेअर सलूनमध्ये भेटायला बोलावले. सुरुवातीला तिने नकार दिला. मात्र तो आग्रह करत असल्याने ती त्‍याला भेटायला गेली.

त्‍याने दुकानाच्‍या बाजूला असलेल्या शाळेत नेऊन तिची छेड काढली. त्‍यामुळे तिने त्‍याच्‍याशी बोलणे सोडून दिले. मात्र मार्च २०२१ मध्ये कुलमखेड भागात ट्यूशनला जात असताना भूषण मागून गाडी घेऊन आला व जबरदस्ती गाडीवर बसवून पुन्‍हा दुकानाजवळील शाळेत नेले व त्‍या ठिकाणी तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. त्‍यानंतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्‍याच्‍या मैत्रिणी असलेल्या दोन युवतींनीही पीडितेला फोटो व्‍हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेच्‍या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी भूषणसह दोन युवतींविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. त्‍याला रात्रीच अटक करण्यात आली आहे.