तरोडा बुद्रूक परिसरात 10 हरणांचा संशयास्पद मृत्यू! घातपाताची शक्यता
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या सीमेवरील व घनदाट जंगल असलेल्या जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक परिसरात 10 हरणांचे मृतदेह आढळल्याने वनविभाग हादरला असून, परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. आदिवासीबहुल जळगाव जामोद तालुक्याला घनदाट जंगलाचे वरदान लाभले आहे. ते संरक्षित असल्याने हरणासारख्या वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. आज जळगाव वनपरिक्षेत्रातील तरोडा बुद्रूक …
May 15, 2021, 20:30 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या सीमेवरील व घनदाट जंगल असलेल्या जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील तरोडा बुद्रुक परिसरात 10 हरणांचे मृतदेह आढळल्याने वनविभाग हादरला असून, परिसरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आदिवासीबहुल जळगाव जामोद तालुक्याला घनदाट जंगलाचे वरदान लाभले आहे. ते संरक्षित असल्याने हरणासारख्या वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. आज जळगाव वनपरिक्षेत्रातील तरोडा बुद्रूक परिसरात हरणांचे मृतदेह असल्याची माहिती मिळताच आरएफओ श्री. कटारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत हरणांचे पोस्ट मार्टम करण्यात आले असून काही भाग तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.