जिगाव प्रकल्पाला “राष्ट्रमाता जिजाऊसागर’ नाव द्या; मराठा पाटील विद्यार्थी समितीची मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात होत असलेला सर्वात मोठ्या जिगाव प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊसागर असे नाव देण्याची मागणी मराठा पाटील विद्यार्थी समितीने खामगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव तालुकाध्यक्ष मोहन घुईकर, अभिजित ढगे, मोताळा तालुकाध्यक्ष देविदास चोपडे, ज्ञानेश्वर महाले,रवी ताठे, विद्यार्थी …
 
जिगाव प्रकल्पाला “राष्ट्रमाता जिजाऊसागर’ नाव द्या; मराठा पाटील विद्यार्थी समितीची मागणी

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात होत असलेला सर्वात मोठ्या जिगाव प्रकल्पाला राष्ट्रमाता जिजाऊसागर असे नाव देण्याची मागणी मराठा पाटील विद्यार्थी समितीने खामगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव तालुकाध्यक्ष मोहन घुईकर, अभिजित ढगे, मोताळा तालुकाध्यक्ष देविदास चोपडे, ज्ञानेश्वर महाले,रवी ताठे, विद्यार्थी समितीचे खामगाव शहराध्यक्ष राम पारस्कर, कार्याध्यक्ष रवि मिरगे, उपाध्यक्ष विठ्ठल वडतकार, सचिव स्वप्नील ताठे, प्रशांत खोंड, मयूर ताठे, प्रशांत ताठे, अनिल जोध, विनय चंडाळणे, गोपाळ भांबेरे, रवीकिरण देशमुख, विठ्ठल कराळे, मंगेश बुंदे पाटील, विठ्ठल पाटील, श्रीकांत मारखेडे, वैभव ताठे, विशाल ताठे, शिवाजी ताठे, श्याम तांगडे, राम तांगडे, वैभव पाटील आदींनी निवेदन दिले.