जळगाव जामोदमध्ये व्‍यापारी संघटनेतर्फे रक्‍तदान शिबिर, 90 जणांनी केले रक्‍तदान

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद येथील व्यापारी संघटनेने नगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनात 25 एप्रिलला रक्तदान शिबिर घेतले. यावेळी 90 दात्यांनी रक्तदान केले. अकोल्याच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलनासाठी सहकार्य केले. महिलांनीही मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, अनिल भगत, जितेश पलन, नीलेश सेदाणी, अजय पलन, महेंद्र पलन, गौतम भंसाली, एफ. आर. …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद येथील व्‍यापारी संघटनेने नगरपालिकेच्‍या सांस्‍कृतिक भवनात 25 एप्रिलला रक्‍तदान शिबिर घेतले. यावेळी 90 दात्‍यांनी रक्‍तदान केले. अकोल्‍याच्‍या डॉ. हेडगेवार रक्‍तपेढीने रक्‍तसंकलनासाठी सहकार्य केले. महिलांनीही मोठ्या प्रमाणावर रक्‍तदान केले. व्‍यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, अनिल भगत, जितेश पलन, नीलेश सेदाणी, अजय पलन, महेंद्र पलन, गौतम भंसाली, एफ. आर. खान, हुसेन डायमंड, प्रकाश सोळंकी, पवन चांडक आणि व्‍यापाऱ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.