जळगाव जामोदमध्ये तूर खरेदी सुरू; सहा हजाराचा भाव मिळतोय..!

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून 22 जानेवारीला तूर खरेदी सुरू झाली आहे. पणन महासंघाचे संचालक प्रसेनजित पाटील यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ झाला.दी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून तूर खरेदी केली जात आहे. तुरीला सहा हजार रुपये प्रति क्िंवटलचा भाव शासनाने दिला आहे. शेतकरी सय्यद अलाऊद्दीन …
 

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून 22 जानेवारीला तूर खरेदी सुरू झाली आहे. पणन महासंघाचे संचालक प्रसेनजित पाटील यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ झाला.
दी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून तूर खरेदी केली जात आहे. तुरीला सहा हजार रुपये प्रति क्िंवटलचा भाव शासनाने दिला आहे. शेतकरी सय्यद अलाऊद्दीन या शेतकर्‍याचा शाल व श्रीफळ देऊन प्रसेनजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन तूर खरेदी सुरू झाली. या वेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विजय ठाकरे, संचालक सुभाष कोकाटे, रमेश भोंडे, रमेश करांगळे, वसंतराव वेरुळकार, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे दीपक धर्माळ, शेतकरी सय्यद अलाऊद्दीन, शंकर भालतडक, चंदू शित्रे, व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे, केंद्रप्रमुख अमोल धुमाळे, नितीन पांडे, अमोल वायझोडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.