जलंबचा पशुवैद्यकीय दवाखाना एकाच कर्मचाऱ्याच्‍या हवाली; पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्‍तच!

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील जलंब येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र वर्षभरापासून पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. केवळ एक कर्मचारी हा दवाखाना सांभाळतात. प्रभारी अधिकाऱ्यावर पशुधनाचा उपचार अवलंबून असल्याने परिसरातील सर्व पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे पशुधनाचा उपचार करावा लागतो. त्यामुळे रिक्त पद भरण्याची मागणी पशुधन मालक करत आहेत. जलंब …
 

जलंब (संतोष देठे पाटील ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील जलंब येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र वर्षभरापासून पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. केवळ एक कर्मचारी हा दवाखाना सांभाळतात. प्रभारी अधिकाऱ्यावर पशुधनाचा उपचार  अवलंबून असल्याने परिसरातील सर्व पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे पशुधनाचा उपचार करावा लागतो. त्यामुळे रिक्त पद भरण्याची मागणी पशुधन मालक करत आहेत.

जलंब गावाची लोकसंख्या बारा हजारपेक्षा जास्त असून, शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुधन सांभाळत आहेत. पशूच्या आरोग्याच्या काळजीसाठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. वर्षभरापासून येथील पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे. त्याजागी प्रभारी अधिकारी म्हणून श्री. पटेल कारभार पाहतात. पटेल यांच्याकडे तालुक्‍यातील अन्य दवाखान्याचा प्रभार असल्याने त्यांना नियमित येणे शक्य नाही. परिणामी येथे उपलब्ध असलेले कर्मचारी भानुदास बोरसे एकमेव कर्मचारी दवाखाना सांभाळत आहेत. जलंब गावाला बरेच खेडेपाडे लागून आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कामाचा ताण येतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कायमस्‍वरुपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्‍ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.