जयंत पाटील शेगावमध्ये कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, बैठकीची जय्यत तयारी, दुपारी 3 ला आगमन

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बुलडाणा जिल्हा दौर्यात शेगावमध्ये श्री गणेश प्रस्थ भवन येथे दुपारी 3 ला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब भाई, युवती आघाडी प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील …
 

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील बुलडाणा जिल्हा दौर्‍यात शेगावमध्ये श्री गणेश प्रस्थ भवन येथे दुपारी 3 ला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब भाई, युवती आघाडी प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैठकीला सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीची जोरदार तयारी झाल्याचे दिसून आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. काझी नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आले होते.