चला दारू घ्या दारू…. चांगेफळमध्ये महिलांनीच भरवला दारू विक्रीचा बाजार!; कारण आहे ‘खास’

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दिल्या. अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र काहीच फरक फडला नाही. अखेर कंटाळून गावातील महिलांनी स्वतःच दारू विक्रीचा निर्णय घेतला. काल, १३ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दारूचा बाजार भरवला. चांगेफळ (ता. संग्रामपूर) येथील महिलांनी दारुड्यांना कंटाळत हे अनोखे आंदोलन केले. रात्री १० …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दिल्या. अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र काहीच फरक फडला नाही. अखेर कंटाळून गावातील महिलांनी स्वतःच दारू विक्रीचा निर्णय घेतला. काल, १३ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दारूचा बाजार भरवला. चांगेफळ (ता. संग्रामपूर) येथील महिलांनी दारुड्यांना कंटाळत हे अनोखे आंदोलन केले. रात्री १० पर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर गावातील पोलीस पाटलांनी पुन्हा एकदा आश्वासन दिल्याने महिलांनी आंदोलन मागे घेतले.

गावात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात. सध्या शाळा बंद असल्याने लहान मुले घरीच असतात. दारुड्यांचे कारनामे मुले बघत आहेत. यामुळे गावातील अनेक शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झाले असल्याचे येथील महिलांचे म्हणणे आहे. अनेकदा पोलिसांत तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने काल गावातील महिलांनी दारू विक्रीचा बाजार भरवून आंदोलन केले. जोपर्यंत गावातील अवैध दारू विक्री बंद होत नाही तोपर्यंत गावातील महिलांनी बिनधास्तपणे दारू विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलीस पाटलांनी मध्यस्ती केली.