ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन; “त्या’ प्रकरणातील ग्रामसेवकाच्‍या पाठिशी खंबीर!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावात शाळकरी विद्यार्थ्याकडून कोविड सेंटरमधील शौचालयाची सफाई करून घेतल्याचे प्रकरण जिल्हाभर गाजले होते. त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने मारोड येथील ग्रामसेवक व्ही. एस. शिवदे व तेथील शाळेतील एका शिक्षकाला निलंबित केले होते. मात्र हे निलंबन अन्यायकारक आहे, अशी भूमिका संग्रामपूर …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील मारोड गावात शाळकरी विद्यार्थ्याकडून कोविड सेंटरमधील शौचालयाची सफाई करून घेतल्याचे प्रकरण जिल्हाभर गाजले होते. त्याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने मारोड येथील ग्रामसेवक व्ही. एस. शिवदे व तेथील शाळेतील एका शिक्षकाला निलंबित केले होते. मात्र हे निलंबन अन्यायकारक आहे, अशी भूमिका संग्रामपूर तालुक्यातील ग्रामसेवक संघनटनेने घेतली आहे. याप्रकरणात निलंबित केलेल्या शिक्षकाला पुनर्स्थापना देऊन न्याय दिला असला तरी अद्याप ग्रामसेवक शिवदे यांचे निलंबन मागे घेण्यात आले नाही. जोपर्यंत शिवदे यांचे निलंबन मागे होत नाही तोपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक प्रशासनासोबत असहकार आंदोलन करणार असल्याचे पत्र ग्रामसेवक संघटनेने संग्रामपूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.