गवंढाळाच्‍या विठ्ठल मंदिराचं छत्र हरपलं; १२ वर्षे पूजा करणारे राजाराम बंड यांना देवाज्ञा

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील गवंढाळा येथील विठ्ठल मंदिरात गेल्या बारा वर्षांपासून भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा करणारे व मंदिराची देखभाल करणारे राजारामभाऊ बंड (६५) यांना ४ ऑक्टोबरला देवाज्ञा झाली. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचताच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात …
 
गवंढाळाच्‍या विठ्ठल मंदिराचं छत्र हरपलं; १२ वर्षे पूजा करणारे राजाराम बंड यांना देवाज्ञा

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील गवंढाळा येथील विठ्ठल मंदिरात गेल्या बारा वर्षांपासून भक्‍तीभावाने विठ्ठलाची पूजा करणारे व मंदिराची देखभाल करणारे राजारामभाऊ बंड (६५) यांना ४ ऑक्‍टोबरला देवाज्ञा झाली. पहाटे साडेचारच्‍या सुमारास त्‍यांच्‍या छातीत दुखू लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचताच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्‍नी, तीन विवाहित मुली आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गवंढाळा गाव शोकाकूल असून, त्यांच्या अंतिमसंस्काराला लोकांना अश्रू अनावर झाले होते.