खासदार जाधव चितोड्यात!; ‘ठाणेदारांनी गुंडाला पाठिशी घातल्यानेच वाघ कुटुंबावर जमावाचा हल्ला; चितोडा अवैध धंद्याचे माहेरघर!’; ठाणेदारासह, बिट जमादाराच्‍या निलंबनाची मागणी गृहमंत्र्यांकडे!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील चितोडा (अंबिकापूर) गाव सर्व प्रकारच्या दोन नंबरच्या धंद्यांचे माहेरघर बनले असून, दारू, वरली, मटका, जुगार, चक्री सर्व प्रकारचे अवैध धंदे तिथे बिनदिक्कतपणे चालतात. गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अभय देण्याचे काम खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार रफिक शेख आणि बिट जमादार राजेश गाडेकर करतात. गुंडांना पाठिशी घातल्यानेच 18 जूनला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगाव तालुक्यातील चितोडा (अंबिकापूर) गाव सर्व प्रकारच्या दोन नंबरच्या धंद्यांचे माहेरघर बनले असून, दारू, वरली, मटका, जुगार, चक्री सर्व प्रकारचे अवैध धंदे तिथे बिनदिक्कतपणे चालतात. गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अभय देण्याचे काम खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार रफिक शेख आणि बिट जमादार राजेश गाडेकर करतात. गुंडांना पाठिशी घातल्यानेच 18 जूनला वाघ कुटूंबावर रमेश हिवराळे ऊर्फ पोत्या या गुंडाने जमावासह हल्ला चढवला. 10 दिवस उलटूनही हल्लेखोरांना अटक नाही; उलट वाघ कुटूंबातल्या सदस्यांनाच पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे गुंडांना अभय देणाऱ्या ठाणेदार रफिक शेख यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. काल, 27 जूनला खासदार जाधव यांनी चितोडा (अंबिकापूर) येथे भेट दिली. त्यानंतर खामगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

19 जून रोजी खामगाव तालुक्यातील चितोडा (अंबिकापूर) येथे वाघ आणि हिवराळे कुटूंबात जुन्या कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली होती. यात वाघ यांच्या ट्रॅक्टर व घराची जाळपोळ झाली होती. या घटनेपूर्वी जेव्हा जेव्हा वाघ परिवार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जायचे, तेव्हा हिवराळे तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल, असे सांगून वाघ परिवाराची तक्रार घेतली नाही. चितोडा येथील रमेश उर्फ पोत्या हिवराळे हा गुंड असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सर्व प्रकारचे दोन नंबरचे धंदे चितोडा गावात चालतात. पोत्याची दादागिरी वाढत असली तरी त्याला अभय देण्याचे काम ठाणेदार शेख आणि बिट जमादार गाडेकर करत आहेत.

पोत्याच्या विरोधात तक्रार द्यायलाही परिसरातील लोक घाबरतात. 19 जूनला मी स्वतः ठाणेदाराला फोन करून चितोडा गावात जायला सांगितले तेव्हा आमचे दोन कर्मचारी गावात गेल्याचे ठाणेदारांनी सांगितले. वास्तवात चितोड्यातील पोत्याच्या जमाव पाहून ते दोन पोलीस पळून गेले, असेही खासदार जाधव म्हणाले. त्यामुळे ठाणेदार रफिक शेख आणि बिट जमादार राजेश गाडेकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आपण गृहमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आमदार आकाश फुंडकर हे सुद्धा ठाणेदारांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार आकाश फुंडकर सुद्धा उपस्थित होते.

खासदार जाधव यांच्‍या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ ः (साभार निर्भिड स्वराज्य) https://www.facebook.com/NirbhidSwarajyaOfficial/videos/504493760977275