खामगाव, शेगाव तालुक्यातील ११ अट्टल गुन्हेगार तडीपार!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव आणि शेगाव तालुक्यातील तब्बल ११ अट्टल गुन्हेगारांच्या तडीपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र जाधव यांनी आदेश काढले आहेत. सर्वसामान्य जनतेच्या जीवास धोका निर्माण होईल आणि सार्वजनिक शांतता भंग होईल अशा पद्धतीने कृत्य हे गुन्हेगार करत असल्याने आगामी दसरा, दिवाळी सणात कोणते विघ्न नको म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
खामगाव शहर, खामगाव ग्रामीण, पिंपळगाव राजा, हिवरखेड, शिवाजीनगर, शेगाव शहर, शेगाव ग्रामीण, जलंब अशी आठ पोलीस ठाणे आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या ५४ जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे दिले होते. त्यापैकी ११ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यात शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या दोन, जलंब पोलीस ठाण्यातील १ तर खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या ८ अशा एकूण ११ जणांना तडीपार करण्यात आले आहे.
६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ः नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर उपविभागातील ६० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३० व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३० जणांचा यात समावेश आहे.
हे आहेत तडीपार गुन्हेगार ः गोविंदा सारंगधर माळवंदे (रा. चांदमारी खामगाव), करण गोपाल हेलोडे, (रावणटेकडी, खामगाव), किसन रामा भागपुरे (रा. सजनपुरी खामगाव), प्रवीण भीमराव बोदडे (व्यंकटेशनगर, शेगाव), गजानन सदाशिव नाईकवाडे (धनगरनगर, शेगाव), गजानन हरिभाऊ शिंदे (चांदमारी, खामगाव), मुरलीधर लक्ष्मण थोटांगे (सुटाळपुरा, खामगाव), सुरेश प्रभाकर डोंगरे ( बाळापूर फैल, खामगाव), जाणुजी निंबाळकर (टाकळी हाट, ता. खामगाव), अनिकेत गणेश देशमुख (रावण टेकडी, खामगाव)