खामगाव नगर परिषद विषय समिती सभापतींची निवड जाहीर
खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी (दि. 21) पार पडली. सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीतील ही शेवटची निवडणूक होती. 32 सदस्य असलेल्या नगरपालिकेत बांधकाम सभापतिपदी सीमाताई वानखेडे, पाणीपुरवठा सभापती जकिया बानो शेख, आरोग्य सभापतीपदी ओमप्रकाश शर्मा, शिक्षण सभापती हिरालाल बोर्ड, तर महिला बालकल्याण सभापती शिवानी कुलकर्णी …
Jan 21, 2021, 19:36 IST
खामगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक गुरुवारी (दि. 21) पार पडली. सत्ताधारी भाजपच्या कारकिर्दीतील ही शेवटची निवडणूक होती. 32 सदस्य असलेल्या नगरपालिकेत बांधकाम सभापतिपदी सीमाताई वानखेडे, पाणीपुरवठा सभापती जकिया बानो शेख, आरोग्य सभापतीपदी ओमप्रकाश शर्मा, शिक्षण सभापती हिरालाल बोर्ड, तर महिला बालकल्याण सभापती शिवानी कुलकर्णी व उपसभापतीपदी भाग्यश्री मानकर यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्य म्हणून रेखाताई जाधव व संतोष पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे.