कोरोनाने नांदुरा तालुक्‍यात आजवर घेतले 33 बळी!; सध्या 100 वर रुग्‍ण घेताहेत उपचार

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यात 30 एप्रिलपर्यंत 30 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार पाचशे एवढी होती. तालुक्यात आतापर्यंत 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करावी, …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यात 30 एप्रिलपर्यंत 30 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, त्‍यातून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार पाचशे एवढी होती. तालुक्यात आतापर्यंत 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शंभरहून अधिक रुग्‍ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करावी, असे आवाहन तहसीलदार राहुल तायडे यांनी केले आहे.

तहसीलदार राहुल तायडे हे पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या पथकासह रस्त्यावर उतरून कोरोनाबाबत जनजागृती करतात. आज,  1 मेपासून 18 ते 45 या वयोगटातील लसीकरण सुरू झाले असून, कोविड 19 वरील सुरक्षेसाठी म्हणून लसीकरण हा एकच पर्याय आहे. कोविशिल्ड व कोव्‍हॅक्सिन या लसी उपलब्ध असून, त्या घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे. जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्‍या संकल्पनेतून व नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्‍या दिग्दर्शन व नियोजनातून मुकुंदकुमार नितोने यांनी गीत तयार केले असून, विठ्ठल साठे अकोला यांनी गीताचे चित्रीकरण व एडिट केले आहे. यात उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख व मलकापूर तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, मोताळा तहसीलदार समाधान सोनवणे यांनी सहकार्य केले, असे तहसीलदार राहुल तायडे यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. गिताचे लाँचिंग आमदार राजेश एकडे यांच्‍या हस्‍ते झाले.