कारचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेकडे मागितले लाख रुपये!; दिले नाही म्‍हणून घराबाहेर हाकलले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरावरून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून २४ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांनी छळ मांडला. तिने हिवरखेड पोलिसांत धाव घेतल्याने पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. वृक्षा सुरेंद्र सदांशिव ( रा. शिरला नेमाने, ता. खामगाव) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. सुरेंद्र …
 
कारचा हप्ता भरण्यासाठी विवाहितेकडे मागितले लाख रुपये!; दिले नाही म्‍हणून घराबाहेर हाकलले!!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरावरून १ लाख रुपये घेऊन ये, असे म्‍हणून २४ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांनी छळ मांडला. तिने हिवरखेड पोलिसांत धाव घेतल्याने पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. वृक्षा सुरेंद्र सदांशिव ( रा. शिरला नेमाने, ता. खामगाव) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. सुरेंद्र वसंत सदांशिव, शीलाबाई वसंता सदांशिव, जितेंद्र वसंता सदांशिव, विशाल वसंता सदांशिव, वसंत जानू सदांशिव (सर्व रा. शिरला नेमाने) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. वृक्षाचे लग्‍न १४ मार्च २०१४ रोजी धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे सुरेंद्रसोबत झाले आहे. पती व सासरच्या मंडळींनी स्विफ्ट डिझायर गाडीचे हप्ते भरण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आण, असा तगादा तिच्‍याकडे लावला. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिने पैसे आणण्यास नकार दिल्‍याने काठीने मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरात राहू नको, माहेरी निघून जा, अशी धमकी दिली. तपास पोहेकाँ रामेश्वर राठोड करत आहेत.