कामगारांना तातडीने द्या मदतनिधीचा लाभ; असंघटीत बांधकाम कामगार विंगची मागणी
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः असंघटित क्षेत्रात कार्यरत इतर कामगार व बांधकाम कामगारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरले असून, आता जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सुविधा केंद्रात ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अट टाळावी. सर्व ऑनलाईन नोंदणी व नुतनीकरण करणार्या कामगारांना मदत निधीचा लाभ द्यावा, अशी मागणी असंघटीत बांधकाम कामगार विंगचे राज्य कार्यकारी सदस्य मच्छिंद्र लक्ष्मण बोराडे यांनी निवेदनाव्दारे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी व वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे. घाटाखालील मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव व जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्याकरिता शेगाव येथे कामगार नोंदणी व नुतनीकरणासाठी सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मच्छिंद्र बोराडे, कमलाकर पहुरकर, शेख फिरोज, दीपक गायकवाड, अ.अजिम, चंद्रमणी पहुरकर आदींच्या स्वाक्षर्या आहेत.